पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते आंबडोस शाळा नंबर १ येथे “डिजिटल इंडिया, डिजिटल आंबडोस” या उपक्रमाचा शुभारंभ

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावठणवाडी येथील आंबडोस शाळा नंबर १ येथे गावातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी “डिजिटल इंडिया, डिजिटल आंबडोस” या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते सोमवार २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री निलेश राणे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकप्रिय शिक्षक संतोष नेरकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून प्रश्नोत्तरे स्पर्धेतील विजत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना सरपंच सुबोधीनी परब यांनी, गावातील मुलांना भविष्यात उत्तम शिक्षणा बरोबर तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे आहे. मुले डिजिटल तंत्रज्ञानाने विकसित झाली तरच मुलांची प्रगती होवू शकते. त्यामुळे गावाचा विकास साधला जाईल. मुलांचा उत्साह आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी तीन शालेय संस्थांच्या उपस्थितीत “डिजिटल इंडिया, डिजिटल आंबडोस” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असे सांगितले.

error: Content is protected !!