फोंडाघाट -कोरगावकरवाडी येथे गणेश मित्र मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी फोंडाघाट- कोरगावकरवाडी येथे गणेश मित्र मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यावेळी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उत्खदनात गणेश मूर्ती मिळाली. त्यानंतर लगतच विटांच्या आडोशामध्ये कामगार- ठेकेदार कुटुंबियांनी छोटेखानी गणेश मंदिर बांधले. या मंदिराचा जिर्णोद्धार रमेश नारकर तथा काका कुटुंबीयांनी केला. आणि मूळ मिळालेल्या मूर्तीसह नूतन सुबक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर मोदी -नारकर कुटुंबीयांनी आणि कोरगावकरवाडीतील अबाल वृद्धांनी त्या वेळेपासून सुरू केलेला माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. विघ्नहर्ता गजानन सर्वांच्या हाकेला धावून जातो अशी येथे येणाऱ्या भाविकाची आणि ग्रामस्थांची श्रद्धा आणि विश्वास आहे.

चालू वर्षी सकाळी नऊ वाजता श्री गणेश अभिषेक, पुजाअर्चा, सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण पूजा, दुपारी महाआरती व महाप्रसाद, संध्याकाळी तीन वाजता महिलाचे हळदीकुंकू, सायंकाळी सात ते नऊ स्थानिक भजने ,आणि रात्री दहा वाजता देव विश्वकर्मा दशावतारी नाट्य मंडळ नेरुर- सुतारवाडी यांच्या ट्रिक्ससीन ने भरलेले ” नरसिंह तेज हरण” हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन गणेश मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे-

error: Content is protected !!