फोंडा हायस्कूलची सेजल हुंबे कणकवलीच्या “नाथ पै वक्तृत्व” स्पर्धेत तृतीय !

“मोबाईल ला गुरु मानणारी आजची युवा पिढी” विषयावरील सेजल च्या वक्तृत्वाने सर्वच अंतर्मुख !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे पुरस्कृत आणि नगरपंचायत- कणकवली आयोजित सलग नवव्या वर्षी नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या कु. सेजल सखाराम हूंबे या मुलीने तिसरा क्रमांक पटकावला. बहुतांश स्पर्धकांनी “कोकण विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे विचार” या विषयावर आपले वक्तृत्वाने उपस्थितांना उदबोधित केले. मात्र सेजलने “मोबाईलला गुरू मानणारी आजची युवा पिढी” यावर आपले वक्तृत्व कौशल्य, धाडसाने आणि परखडपणे मांडून, उपस्थितांसह परीक्षकांचे कौतुक मिळविले. या स्पर्धेत तिसरा क्रमांक तिने मिळवला असला तरी, या स्फोटक आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या विषयात सेजल प्रथम आली हे उल्लेखनीय !

“ऑनलाइन शाळेमुळे मोबाईल बनला गुरु | घरात बसून विद्यार्थ्यांची झाली शिकवणी सुरू ||” या स्लोगननी आपल्या वक्तृत्वाची सुरुवात करून, तिने विषयालाच हात घातला. मोबाईलची गरज, त्याचा इतिहास, सहज सुलभ आवश्यकता, वापर, त्याची व्यसनाधिनाता, त्याचा दुरुपयोग, फ्रॉड, आरोग्यावर परिणाम, सामाजिक दुरावस्था, सायबर क्राईम, एआय – सोशल मीडियाचा अतीवापर, नात्यातील दुरावा, आणि त्यामुळे होणारे गंभीर परिणाम, यातून मिळवलं किती? आणि घालवलं किती ? यांना स्पर्श करत – काव्यांची पेरणी करत – उपस्थितांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. धारदार – परखड आणि प्रभावी अविष्कारातील स्वातंत्र्याचा वापर करून, आपल्या भावना व्यक्त केल्या अन् आपल्या वक्तृत्वाची सेजलने छाप पडली. तिला वक्तृत्व कौशल्यासाठी मराठी विभागासह सहशिक्षिका सायली पवार यांनी मार्गदर्शन केले आणि संचालकांसह, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांनी तिला वक्तृत्व शैलीसाठी सहकार्य केले. तिच्या यशाचे शाळेतील सर्वांसह परिसरात कौतुक होत आहे

error: Content is protected !!