हुंबरट-फोंडा तिठा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जा कडे

जबाबदार अभियंताचे कामांच्या दर्जाकडे दुर्लक्ष ! कालांतराने रस्ता पुनः खड्डेमय व साईड पट्ट्या खचण्याची भीती !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या कित्येक महिन्यानंतर बांधकाम विभागांने सुरू केलेला वादग्रस्त हुंबरट फोंडा तिठा रस्त्यावर जबाबदार अभियंत्यांचे, कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याने, रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय, तसेच साईड पट्ट्या खचण्याची भीती वाहन चालक तसेच ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. अधीक्षक अभियंता तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाकडे वारंवार पाहणी करून, तसेच लक्ष ठेवून रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीसाठी योग्य करावा अशी आग्रही मागणी पुढे येत आहे.

रस्त्याची साईड पट्टी व कडा पूर्णतः अवजड वाहतुकीमुळे खचलेली आहे. वाहने कलंडण्याची भीती तसेच कडा चुकविण्याच्या नादात चालकाकडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.सदर कडांचे मजबुतीकरण आवश्यक असताना, माती न काढता किंवा योग्य आकाराची खडे न वापरता अथवा त्याखाली टॅग कोट न वापरता केलेले डांबरीकरण किती दिवस टिकेल ? याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. रस्त्याची व साईड पट्टीच्या कडांची केलेली भरणी अजूनही लेवल व्यस्त व खचलेली आहे. काही ठिकाणी केलेले बीबीएम उखडून निकृष्ट दर्जाचेही झाले आहे. पाण्याच्या निचरासाठी केंबर -उतार केलेला नाही. याकडे सक्षम अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्ता वाहतुकीसाठी टिकाऊ व सुलभ करावा अशी आग्रही मागणी या भागात होत आहे.

error: Content is protected !!