त्या वाघिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा मनसेचा आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद असून याची सखोल चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडे केली. दाभीळ येथील सातबांव या जंगल भागात चार दिवसापूर्वी एका विवरात मृत वाघिण आढळून आली होती. पशुवैद्यकीय अहवाल व प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर वनविभागाने तो मृत्यू पाण्यात बुडून झाला असे स्पष्ट केले होते. एकूणच आज याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने उपवनसंरक्षक रेड्डी यांची भेट घेत हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली शिवाय जिल्ह्यात आढळणारे पट्टेरी वाघ यांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आहे असे सांगितलं. त्यामुळे ठीक ठिकाणी ट्रॅपिंग कॅमेरे लावण्यात यावे व या पट्टेरी वाघांचं संरक्षण करावे अशी मागणी केली.

सावंतवाडी ते दोडमार्ग भागात आठ पट्टेरी वाघांची नोंद असताना जिल्ह्यात यांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना नाही ते राबवा व त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये माकड, गवे रेडे यांनी अक्षरशः शेती बागायती नारळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे परंतु पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते त्यामुळे या वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपण गांभीर्याने लक्ष द्या. वन्य प्राण्यांना खाद्य लागतं अशी वनस्पती राखीव वनक्षेत्रात ठिकाणी लावा व पानवटे तयार करा जेणेकरून हे वन्यप्राणी बाग, बागायतीचे नुकसान करणार नाही. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर व शुभम नाईक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!