मसूरे (प्रतिनिधी) : कांदळगावचे सुपुत्र तथा ओझर विद्या मंदिर कांदळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस परब यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव या ग्रंथालयाच्या वतीने शालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गट क्रमांक १ (इयत्ता १ली ते ३री) प्रथम- सुनंदा आनंद धुरी, जि. प. प्राथमिक शाळा कोळंब कातवड कातवड, द्वितीय- हृदया नारायण मेस्त्री, जि. प. प्राथमिक शाळा कांदळगाव नं.१, तृतीय वेदराज अंकुश कणेरकर, जि. प. शाळा, कोळंब – कातवड. गट क्रमांक २ (इ.४थी ते ५वी) – प्रथम रुचिरा संजय कुंभार जि प. प्राथमिक शाळा कांदळगाव, नं.१, द्वितीय विभागून विभा युगलकिशोर प्रभूगावकर जीवन शिक्षण विद्यामंदिर कोळंब नं.१, योगेश यशवंत आयकर, जि. प. प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १, तृतीय स्मृती उदय परब, जि. प. प्राथमिक शाळा नं.१. गट क्रमांक ३ (इ ६वी ते ८वी) प्रथम चिन्मयी राजेंद्र पारकर,ओझर विद्या मंदिर, कांदळगाव, द्वितीय लावण्य दीपक गोसावी, जीवन शिक्षण विद्या मंदिर कोळंब नं.१, तृतीय राधिका विरेश पाताडे, जीवन शिक्षण विद्यामंदिर कोळंब नं. १, गट क्रमांक ४ (इ. ९वी ते १०वी) प्रथम अस्मी प्रवीण पारकर, ओझर विद्या मंदिर कांदळगाव.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उत्सवमूर्ती जी. एस. परब, बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, नंदकुमार राणे, पुणे येथील विकासक ॲड. प्रदीप कडेकर, ग्रंथालयाचे अध्यक्ष उदय परब, कार्यवाह प्रविण पारकर, स्पर्धेचे परीक्षक विजय नातू, गुरुनाथ ताम्हणकर, मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे पदाधिकारी शांताराम परब, शरद परब, रंजना नेवाळकर, कांदळगाव ग्रामपंचायतचे सदस्य संतोष पारकर, आचरे येथील विनायक परब, ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मधुसूदन परुळेकर, सदस्य गजानन सुर्वे, ग्रंथपाल साक्षी मेस्त्री, कर्मचारी महेश साळकर, शिक्षक, पालक, स्पर्धक विद्यार्थी, वाचक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











