चिंदर गावची डाळपस्वारी ८ मार्च पासून…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावची डाळपस्वारी ८ ते ११ मार्च पर्यंत होणार असून शनिवार ८ मार्च रोजी सकाळी १० नंतर देव डाळपस्वारी भगवती माऊली मंदिर येथून निघून काजरा देव, चिंदर सडेवाडी ब्राह्मण देव मंदिर, सडेवाडी गोसावी मठ येथे दर्शन, भेट देत दुपारी पिसाळी ब्राह्मण देव मंदिर येथे महाप्रसाद, घेऊन तेरई मांड येथून भाविक भक्तांना दर्शन, आशिर्वाद देत रात्री तेरई ब्राह्मण मंदिर येथे पोहचून विसावणार असून रविवार ९ मार्च रोजी दुपार नंतर तेरई ब्राह्मण मंदिर येथून बाहेर पडून भगवंत गड किल्ल्यांवरील सिध्देश्वर, रेडेचाळा, लब्देब्राम्हण, कोळकर ब्राह्मण, केळ ब्राह्मण यांची भेट घेत रात्रौ उशिरा पालकरवाडी येथील गांगेश्वर मंदिरात पोहोचणार असून सोमवार १० मार्च रोजी गांगेश्वर मंदिर येथे विश्रांती करणार आहेत.

मंगळवार ११ मार्च रोजी संध्याकाळी देव डाळपस्वारी गांगेश्वर मंदिर येथून निघून संध्याकाळी गावडे पुरुष मंदिर येथे महाप्रसाद घेऊन विने प्रभू, भावई ब्राह्मण, गुरु दत्तात्रय यांची भेट घेऊन भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत फटाक्यांच्या आतषबाजीत रात्रौ उशिरा सातेरी मंदिर येथे पोहोचणार आहे.

error: Content is protected !!