बिबट्या आढळला मृतावस्थेत ; नेरूर साईगाव येथील घटना

मादी बिबट्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

कुडाळ (प्रतिनिधी) : दि ६ मार्च रोजी परिमंडळ नेरुर त. हवेली कडील नियतक्षेत्र नेरुर त. हवेली मधील साईगांव येथील रहिवासी सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी वनपाल नेरुर त. हवेली यांना भ्रमणध्वनीवर बिबट्या मृत झाल्याची बातमी दिली. त्यानुसार वनपाल नेरुर त. हवेली यांनी सदर घटनेबाबतची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल यांना दिली.

त्याप्रमाणे सहा.वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी वनपाल नेरुर त. हवेली व वनरक्षक नेरुर त. हवेली यांच्यासमवेत जागेवर जाऊन पाहाणी केली असता, वन्यप्राणी बिबट मृत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर कुडाळ पशुवैद्यकिय अधिकारी यांना बोलाविण्या आले.पशुवैद्यकिय अधिकारी कुडाळ यांनी सदर मृत बिबट्याची पाहाणी केली असता बिबट हा मादी असून त्याचे अंदाजे वय 4 ते 5 वर्षे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी आजु बाजूच्या परिसराची पाहाणी करुन व चौकशी करुन, खात्री करुन पंचनामादी कागदपत्रे तयार केली आहे. तद्नंतर मृत बिबटयाचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी यांच्यामार्फत सावंतवाडी उप-वनसंरक्षक, सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी व वन अधिकारी/कमर्चारी यांच्या समक्ष शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले. शवविच्छेदन करताना मृत्युचे नेमके कारण समजण्याकरिता मृत बिबट्या मादीच्या अवयवांचे नमुने घेण्यात आले आहेत. ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येणार असून, सदर घटनेबाबत वनपाल नेरुर त. हवेली यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट वप्रार 02/2025 चा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा पुढील तपास उप-वनसंरक्षक सावंतवाडी व सहा. वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

error: Content is protected !!