अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची निवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपाटण येथे नुकतीच स्थापना करण्यात आली असून रोटरी क्लब खारेपाटणच्या अध्यक्षपदी रोट्रियन – दयानंद बंडू कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बदल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे रोट्रियन संजय रावराणे यांनी खारेपाटण रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष दयानंद कोकाटे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर सर्वांना शुभेछा दिल्या. रोटरी क्लब मार्फत आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजेची अनेक भरीव कामे केली जातात. या क्लबची स्थापना करण्यासाठी खारेपाटण येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी एकत्र येऊन खारेपाटण रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली.खारेपाटण हायस्कूल येथे पार पडलेल्या पहिल्या सभेमध्ये सर्व २२ रोटरियन सदस्य उपस्थित होते. बयावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष म्हणून दयानंद कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर इतर कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.
क्लब सचिव – Rtn. अजय जनार्दन गुरसाळे, क्लबचे उपाध्यक्ष – Rtn. मंगेश वसंत ब्रम्हादंडे,क्लबचे कार्यकारी सचिव – Rtn. संकेत प्रकाश शेट्ये,क्लब कोषाध्यक्ष – Rtn. सारिका सचिन महिंद्रे,सार्जंट ॲट आर्म्स – Rtn. यशवंत चंद्रकांत रायबागकर,क्लब फाउंडेशन चेअरमन – Rtn. रमाकांत आकाराम राऊत, क्लब सदस्यत्व अध्यक्ष – Rtn. आत्माराम देउ कांबळे, क्लब सार्वजनिक प्रतिमा अध्यक्ष – Rtn. योगेश सुरेश गोडवे, क्लब सेवा प्रकल्प अध्यक्ष – Rtn. सुबोध विजय देसाई, क्लब लर्निंग फेसिलिटेटर – Rtn. संतोष गंगाराम राऊत, क्लब यंग लीडर्स संपर्क – Rtn. संकेत प्रविण लोकरे आदीची यावेळी निवड करण्यात आली. रोटरी क्लब खारेपाटणच्या माध्यमातून खारेपाटण पंचक्रोशी मध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणार असल्याचा विश्वास यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे नूतन अध्यक्ष दयानंद कोकाटे यांनी व्यक्त केला.











