मोटारसायकल व टेम्पो यांच्यात अपघात

रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : दाट धुक्यामुळे ऍक्टिव्हा मोटारसायकल व भाजीचा टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे.मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत होता. त्यांच्या मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हळविण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी ७. ३० वा. सुमारास तिरवडे येथे घडला.

गगनबावड्याहून भाजीचा टेम्पो वैभववाडीच्या दिशेने येत होता. तर मोटार सायकलस्वार हे रत्नागिरीहुन कोल्हापूरकडे जात होते. सकाळी सर्वत्र दाट धुके पडले होते. धुक्यात अंदाज न आल्यामुळे तिरवडे येथील सर्व्हिस सेंटर जवळ असलेल्या वळणावर टेम्पो व ऍक्टिव्हा यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटना स्थळी धाव घेत जखमीना तातडीने रुग्णवाहीका बोलावून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला.तर गंभीर जखमी तरुणीवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!