विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव लिंगेश्वर हितवर्धक मंडळ आयोजित सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा गुरुवार दि. १ मे रोजी कळसुली गवसेवाडी येथे आयोजित केली आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी १ मे रोजी सकाळी ११.०० वा. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ०२ ते ०३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ दुपारी ०३ ते ०६ वा. लहान मूलांचे प्रोग्रॅम तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची, सायं. ७.३० ते ८.३० वा. वारकरी संप्रदाय हरिपाठ, रात्री. ०९ ते १०.३० वा. सुस्वर भजन गायक चिन्मय सावंत, गांगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ डामरे-कणकवली, सायं. १०.३० ते ११वा.बक्षिस वितरण समारंभ, रात्रौ. ११.०० वा. श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली, ता. सावंतवाडी यांचे दशावतारी नाटक “पुत्र झाला दगड” सादर होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन कळसुली लिंगेश्वर हितवर्धक मंडळ (गवसेवाडी) यांनी केले आहे.












