शिवजयंती दिवशी दुर्देवी मृत्यू
कोल्हापुर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरातील धोत्री गल्लीत कट्टर शिवसैनिक, निस्सीम शिवभक्त मारुती उर्फ बाळासाहेब निगवेकर हे राहत होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोल्हापुरात साजरी होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ते मोटारसायकल वर शिवरायांची मूर्ती ठेवून स्पीकरवर शिवरायांची गाणी लावून कोल्हापुरात फेरफटका मारत होते. यावेळी ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एका निस्सीम शिवभक्ताचा शिवजयंती दिवशी झालेला अंत बघून अख्ख्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












