तिरवडे तर्फ खारेपाटण येथे घरावर चिंचेचे झाड पडून नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिरवडे तर्फ खारेपाटण येथील संतोष भिकाजी पवार यांच्या राहत्या घरावर चिंचेचे झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत घरातील माणसे सुदैवाने बचावले असून एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक घडली.

संतोष पवार कुटुंबियांचे पाच सदस्य रात्री जेवण करून घरात झोपले होते. पहाटे साखर झोपेत असताना घरा शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाची मोठी फांदी घरावर मोडून पडली. अचानक घरावर झाड पडल्यामुळे गाड झोपेत असलेल्या कुटुंबियांचा गोंधळ उडाला. या घटनेत पवार यांच्याकडे पाहुण्या म्हणून आलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्यात कौल पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच सरपंच जितेंद्र तळेकर, पोलीस पाटील प्रल्हाद पावले, यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. या घटनेचा पंचनामा तलाठी श्री जाधव यांनी केला आहे.

error: Content is protected !!