बुलडोझर केवळ रस्त्याच्या कामांसाठीच नाही तर अजूनही काही ठिकाणी चालतात – पालकमंत्री नितेश राणे

भेडशी जिहादी कारवाई प्रकरणी दिला इशारा

ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग भेडशी या ठिकाणी शिकवणीच्या नावाखाली जिहादी कारवाया केल्या जातात हे उघड झालंय. असे प्रकार अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत मात्र असे प्रकार माझ्या जिल्ह्यात मी खपून घेणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुलडोजर हे रस्त्याच्या कामा व्यतिरिक्त अजूनही काही ठिकाणी चालतात हे अशा लोकांना दिसून येईल असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी या ठिकाणी एका व्यक्तीने राहण्यासाठी घर बांधून त्या ठिकाणी अनधिकृत रित्या मदरसा चालविला होता. त्यामध्ये तलवारी आढळून आल्या असून, या ठिकाणी बिहारमधील शिक्षक शिकवित होता. याबाबत बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की,राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे .त्यामुळे असे जिहादी प्रकार आणि जिहादी प्रकाराची माणसे या कुणालाही सोडले जाणार नाही. मी कडवट हिंदुत्ववादी आहे.त्यामुळे मी ज्या जिल्हाचा पालकमंत्री आहे, तिथेतर असे प्रकार खपूनच घेणार नाही. माझे पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. जिल्ह्यात असलेल्या मदरशांची तपासणी करावी आणि या मदरशांमध्ये निश्चित काय चालते याची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणी खरोखरच शिक्षण दिले जाते की दहशवादी घडविले जातात हे पाहिले जाईल आणि अशा प्रकारचे जे ढाचे असतील ते उध्वस्त केले जातील असा विश्वास मी जिल्ह्यातील जनतेला देतो.जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. या सर्वांची सखोल चौकशी करून या सर्वांवर कडक आणि कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत आपण सूचना दिल्या असून, पोलीस यंत्रणा या सर्व बाबींची कसून चौकशी करत आहे. जिल्ह्यात अजून काही ठिकाणी मदरसे सुरू आहेत. या मतदारशांची सखोल चौकशी करून या मदरशांमध्ये शिकविण्या व्यतिरिक्त अजून काही चालते का याची चौकशी करणे सुरू आहे. यामध्ये जर जिहादी प्रक्रिया सुरू असतील तर असे सर्व मदरसे तात्काळ बंद करून त्यांच्यावर बुलडोझर फिरविला जाईल. अशा जिहादी लोकांवर अशी कारवाई केली जाईल की त्यांना त्यांना शुक्रवारही साजरा करता येणार नाही. असे सांगताना पोलिसांना दांडे खरेदी करण्यासाठी जो खर्च केलाय तो उगाच नाही. त्याचा वापर निश्चित केला जाईल असा सज्जड इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हलवावी ही इच्छा महाराष्ट्रातील सर्वच हिंदूंची आहे मात्र याबाबत योग्य वेळी आणि योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील हा विश्वास मी सर्व हिंदूंना देतो असे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

error: Content is protected !!