खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासन यांचे वतीने सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानामध्ये खारेपाटण हायस्कूलने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून सन महाराष्ट्र शासनाच्या “माझी शाळा सुंदर शाळा” या अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कणकवली तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. सदर अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल ने तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
नुकताच सदर स्पर्धेचा पारितोषिक विचारणा समारंभ कणकवली पंचायत समिती येथे पार पडला. यावेळी खारेपाटण हायस्कूलच्या वतीने प्रशालेचे शिक्षक कापसे यांनी पारितोषिक स्वीकारले. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख पवार, गटविकास अधिकारी गवस, इतर मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुवीर राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व संचालक यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले आहे.














