देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा पाणी प्रश्न साेडवण्यात सत्ताधारी अपयशी

भाजपा नगरसेवक शरद ठुकरुल यांची टिका

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीचा पाणी प्रश्न अदयाप अधांतरीच सत्ताधारी अपयशी 1 वर्ष होवूनही पाण्याचा प्रश्न प्रलंबित असा प्रश्न भाजपा नगरसेवक शरद ठुकरुल यांनी केला आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नव्या कारभा-यांना सत्तेमध्ये येवून 1 वर्ष झाले आहे. तरी देखील वर्षभरात सत्ताधारी पक्षाने अदयाप शहराचा पाणी,सांडपाणी,घनकचरा व्यवस्थापन तसेच दिवाबत्ती प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहेत. अशी टिका विरोधी गटनेते भाजपा नगरसेवक शरद ठुकरुल यांनी केला आहे.

भाजपा येथील संपर्क कार्याल्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका प्रणाली माने,तन्वी चांदोस्कर,आदया गुमास्ते,रुचाली पाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ठुकरुल म्हणाले की, नगरपंचायतीची निवडणुक झाल्यानंतर नवे कारभारी येवून वर्ष झाले तरी देखील वर्षभरात शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न तसेच घनकचरा व्यवस्थापन आदी प्रश्न सुटलेले नाहीत. शिवाय मोकाळ गुरांची समस्या, कुत्री यांचाही त्रास काही कमी झालेला दिसत नाही. आठवडी बाजाराचा प्रश्नही सुटलेला नाही. उलट नगरपंचायत प्रशासन कामाची उरक करण्यात कमी पडत असल्याची सत्ताधा-यांची वारंवार तक्रार होत आहे. या विरोधात उपोषण देखील करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मात्र सत्ताधारी आपल्या अपयशाचे खापर प्रशासनावर फोडू पाहत आहेत. अशी टिका देखील त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!