वैभववाडी (प्रतिनीधी) : कोकिसरे कुंभार समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 25 एप्रिल ते रविवार दिनांक 27 एप्रिल या कालावधीत श्री संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यनिमित्त विविध धार्मिक व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 27 एप्रिल रोजी पहाटे ५. ३० ते ६ वाजता काकड आरती, सकाळी ७. ३० वा. ते ८. ३० वा. नित्य पूजा पाठ,सकाळी ९ ते ९. ३० महाआरती,सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामेश्वर मंदिरात लघु रुद्राभिषेक. दुपारी १२. ३० ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३. ३० ते ४. ३० पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू,सायंकाळी ४. ३० ते ५. ३० पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभ, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल उपस्थित राहणार आहेत. रात्री ७ ते ९ महाप्रसाद तसेच रात्री ८. ३० ते १०…३० पारंपरिक डबलबारी भजनांचा जंगी सामना , बुवा श्री संदीप लोके व बुवा श्री प्रवीण सुतार यांच्या भजनांचा डबलबारी सामना रंगणार आहे. तर शनिवारी सकाळी काकड आरती नित्यपूजा पाठ सकाळी १० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी व संत शिरोमणी गोरोबाकाका मूर्तीवर अभिषेक व पूजा सकाळी ११ते १२ हरिपाठ, दुपारी महाआरती व महाप्रसाद सायंकाळी ४ ते ६. ३० वा. संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिर ते श्री सिद्धेश्वर मंदिर कोकिसरे दरम्यान भव्य दिंडी सोहळा पार पडणार आहे. तर रात्री ९ ते १०. ३०वा विनोद महाराज पाटील खंबाळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे रात्री कोकिसरे समाज मंडळाचे भजन तर रविवार दिनांक २७ रोजी सकाळी ९ ते १० काल्याचे किर्तन ह. भ. प. श्री विष्णू बापू खेडेकर महाराज (कोकिसरे कुंभारवाडी) यांचे होणार आहे. तर सकाळी १० ते १०. ३० महाआरतीसोळ्याने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन कोकिसरे कुंभार समाज मंडळ मुंबई व ग्रामीण यांच्यावतीने करण्यात आले आहे.












