देवगड (प्रतिनीधी) : तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी तर सरचिटणीसपदी दिनेश साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उमाबाई बर्वे लायब्ररीच्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत ही नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक संतोष राऊळ, किशोर जैतापकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी समितीचे मावळते अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळित आदी उपस्थित होते. समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी, उपाध्यक्षपदी दयानंद मांगले, अनिल राणे, सरचिटणीसपदी दिनेश साटम, सहचिटणीसपदी सचिन लळित, कोषाध्यक्षपदी महेश तेली, कार्यकारिणी सदस्यपदी अयोध्याप्रसाद गावकर, सुरज कोयंडे, राजीव पडवळ, विश्वास मुणगेकर, संतोष साळसकर, नागेश दुखंडे, स्वप्नील लोके यांची निवड करण्यात आली. तर पालक सदस्य म्हणून जिल्हा प्रतिनिधी प्रशांत वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके यांची निवड करण्यात आली.
यावेळी नुतन अध्यक्ष हेमंत कुळकर्णी म्हणाले, पत्रकारांना रोजच्या वृत्तसंकलनासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. डिजिटलायझेशनच्या युगात पत्रकारांना प्रशिक्षण महत्वाचे असून या सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत. एआय तंत्रज्ञान सर्व सदस्यांना उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करू. पत्रकारांचे दैवत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले येथे भव्य दिव्य स्मारक उभारावे, अशी सर्वच मराठी पत्रकारांची इच्छा आहे. यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार आहोत. पत्रकारांची गरिमा व समाजातील पत्रकारांचे स्थान उंचावले पाहिजे, यासाठीही काम करू, असे त्यांनी सांगितले.












