संघटनेच्या कार्यकारिणीच्या सभेचे देखील आयोजन
.
खारेपाटण (प्रतिनीधी) : कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शुक्रवार २५ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता संघटनेचे कार्यकर्ते श्री अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी ‘ श्री संत सेना महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले असून’ तसेच यावेळी संघटनेची महत्वपूर्ण कार्यकारिणी सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महिला आघाडीच्या सदस्यांचाही सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून होईल. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचले जाईल आणि त्याला मंजुरी दिली जाईल. महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचा जमा-खर्च अहवाल सादर केला जाणार असून, त्याला मंजुरी मिळवली जाईल.
या विशेष कार्यक्रमात संत सेना महाराज नाभिक पतसंस्थेचे चेअरमन मा. भाऊ चव्हाण यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच,आगामी सावंतवाडी येथे होणाऱ्या सेमिनारच्या आयोजनाबाबत चर्चा आणि नियोजन केले जाईल. यासोबतच, कणकवली तालुका मर्यादित सेमिनारचा आराखडा तयार करण्यावरही बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
कणकवली तालुका नाभिक संघटनेने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना या महत्वपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.












