जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबुडकर यांची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत लोरे नं1 गावाला भेट
कणकवली (प्रतिनीधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर हे महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय उपक्रम निमित्ताने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेट देत असताना आज संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०२४-२५ तालुकास्तरीय निवड झाल्यानंतर जिल्हास्तरीय मूल्यमापन करण्यासाठी कणकवली तालुक्यातील लोरे गावाला भेट दिली.गावातील विविध योजनांचा आढावा घेत असताना स्वच्छता,आरोग्य, शिक्षण,पाणी स्त्रोत,कचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन, व इतर बाबींवर आढावा घेत चर्चा करून महत्वपूर्ण सूचना केल्या.लोरे गावातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत असताना.उपक्रमांचे कौतुक करत असताना समाधान व्यक्त केले तसेच श्री.देव रुजेश्वर उद्यान ला भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले. व स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या समवेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए एम परब,शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, गट विकास अधिकारी, अरुण चव्हाण , विस्तार अधिकारी, सूर्यकांत वारंग, गटशिक्षणाधिकारी श्री.गवस, ग्रामपंचायत लोरे चे सरपंच अजय रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी,राकेश गोवळकर , ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग,आदी.उपस्थित होते.












