पालकमंत्री नितेश राणेंकडून नूतन तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्रींचे अभिनंदन

भाजपा तालुकाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर पालकमंत्र्यांचे मेस्त्री यांनी घेतले आशीर्वाद

कणकवली (प्रतिनीधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपा कणकवली तालुकाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल मिलिंद मेस्त्री यांचे अभिनंदन केले. भाजपा कणकवली तालुका मंडल अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची फेरनिवड झाल्यानंतर मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई सुवर्णगड येथे सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले.यावेळी कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष तथा हरकुळ खुर्द उपसरपंच सर्वेश दळवी, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, भाजपा युवा मोर्चा ग्रामीण मंडल अध्यक्ष अण्णा खाडये उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मिलिंद मेस्त्री यांचे अभिनंदन करतानाच अशाच पद्धतीने पक्षसंघटनेसाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या ऐतिहासिक विजयासाठी आणि विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या विक्रमी लीड च्या विजयी हॅट्ट्रिक साठी मिलिंद मेस्त्री यांनी अथक मेहनत घेतली होती. पक्षसंघटना वाढविण्यासाठी पक्षशिस्त पाळून नेहमीच मेस्त्री यांनी मेहनत घेतली. त्यामुळेच मिलिंद मेस्त्री यांच्यावर पुन्हा एकदा भाजपा कणकवली तालुका मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल अभिनंदन करतानाच भावी राजकीय वाटचालीस पालकमंत्री नितेश राणे यांनी मेस्त्री यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!