माजी भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद पारकर, माजी मंडळ अधिकारी मिलिंद पारकर याना पितृशोक
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी गावचे माजी सरपंच तथा माजी पं स सदस्य प्रकाश उर्फ आबा शंकरशेठ पारकर ( वय 79 ) यांचे वृद्धत्वाने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना कणकवलीत खाजगी रुग्णलयात 2 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे 3 वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले. प्रकाश पारकर हे संपूर्ण घोणसरीसह तालुक्यात आबा या नावाने परिचित होते. घोणसरी गावातील सर्वात जुने भुसारी दुकानमालक म्हणून ते सुपरिचित होते.घोणसरी गावचे सरपंच पद यशस्वीरीत्या भूषवितानाच लोरे पं स मतदारसंघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. घोणसरी गावच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या मृतदेहावर घोणसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त महसूल मंडळ अधिकारी मिलिंद उर्फ बंड्या, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष मकरंद उर्फ छोटू, आणि साक्षात पारकर यांचे ते वडील होत.आबा यांच्या निधनाने घोणसरी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चत पत्नी, 3 मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.