संच मान्यतेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट
वैभववाडी (प्रतिनीधी) : दिनांक 15 मार्च 2024 संच मान्यता निकषातील अटी शिथिल कराव्यात म्हणून कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २५ मार्च २०२५ रोजी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर केले होते. शिवाय 11/04/2025 रोजी दुपारी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा डी. पी . सी च्या बैठकीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुद्दा उपस्थित करत जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री ,खासदार नारायण राणे यांनी पालक मंत्री नितेश राणे यांना आपण दोघांनी शिक्षण मंत्र्यांना भेटून ह्या जीआर संदर्भातील अटी दूर करण्या संदर्भात चर्चा करावी असे सुचविले होते त्यास अनुमोदन देत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पालकमंत्र्यानी भेटी संदर्भात जिल्हा नियोजनच्या बैठकीत आश्वासन दिले होते.
यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे व कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची भेट घेऊन तात्काळ सदर आदेश दुरुस्त करावा व निकष बदलावेत अशी चर्चा केली त्यानुसार शिक्षण मंत्री यांनी शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांना आदेश दुरुस्त करण्या संदर्भातल्या तशा सूचना दिल्या आहेत. संच मान्यता अटी संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांची शिष्टाई फळाला आली.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक बांधवांना दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांकडून शिक्षक संघटनांकडून पालकमंत्री नितेश राणे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.












