रोटरी क्लब चार्टर्ड प्रेसिडेंट दीपक बेलवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांचा स्नेहमेळावा

गोपुरी आश्रम चिकूची बाग येथे २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब कणकवली चे चार्टर्ड प्रेसिडेंट समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते दीपक बेलवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांचा स्नेहमेळावा शुक्रवार २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता गोपुरी आश्रम वागदे येथील चिकूच्या बागेत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त गायन स्पर्धा फनी गेम्स संपन्न होणार आहेत. दीपक बेलवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याबाबत सुनील सावंत मोबा. ९४२०६५४६२४ सदाशिव राणे मोबा. ९४२०१०४८८३ आणि नितीन बांदेकर मोबा. ९४२३३००३५ यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब कणकवली चे प्रेसिडेंट जगदीश राणे, सेक्रेटरी ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!