वैभववाडी (प्रतिनिधी) : दत्त वि.मं.वैभववाडी शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी आयुष प्रदीप नाळे यांने सलग चौथ्या वर्षी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवून ऑल इंडिया रँक सुवर्ण पदक मिळवून स्कॉलरशीप प्राप्त केली आहे. सदर परीक्षा जानेवारी 2023 ला घेण्यात आली होती. तसेच इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत 200 पैकी 184 गुण मिळवून आयुषने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
आयुषला सौ.मनिषा सरकटे मॅडम,सौ.मेघा नाळे मॅडम, श्री.पाडदेवाड सर, श्रीम.सावंत मॅडम ,सौ.दीप्ती पाटील मॅडम,सौ.कुडतरकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिनगारे ,शा.पो.आ.अशिक्षक श्री.अशोक वडर ,केंद्रप्रमुख श्री रामचंद्र जाधव,शा.व्य.समिती यांनी कु.आयुषचे अभिनंदन केले.