देवगड (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने त्रिसरण बुध्द विहार मिठबाव येथेआयोजित व्यसनमुक्त भीम जयंती उत्सव अभियान प्रचार मोहीमेस सुरुवात करण्यात आली. अभियान राबविण्याचा हेतू स्पष्ट करतांना नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी महामानवांचे विचार आत्मसात करण्यासाठी आपण जयंती साजरी करत असतो . पण आपण नकळतपणे अती उत्साहात चुकीच्या पद्धतीने महामानवांचे जयंती उत्सव साजरा करतो कधी कधी नकळतपणे व्यसनांचा आधार घेऊन आनंद साजरा करत असतो. यांचा परिणाम व्यसनाधीनता वाढीस लागते. ती टाळण्यासाठी येणाऱ्या पिढीला महामानवांचे विचार सांगायचे तर ते निर्व्यसनी राहूनच असे उत्सव साजरे करावेत. असे विचार मांडले. यावेळी मिठबाव बौध्दजन सेवा मंडळाचे सचिव सर्व पदाधिकारी महिला मंडळाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. तसेच मिठमुंबरी पंचशील महिला मंडळाच्या सचिव रिमा मुंबरकर, उपाध्यक्ष दक्षता मुंबरकर, शांती बागवे यांनी व्यसनमुक्ती गीत सादर करून गीतातून व्यसनमुक्ती चा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन करण्यात आली.
Very very good