खारेपाटण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

संपर्क प्रमुख सतीश गुरव, युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत तर युवा सेना उपविभाग प्रमुख नीखील गुरव यांचा समावेश

खारेपाटण (प्रतिनिधी) : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, कणकवली युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत तसेच खारेपाटण शिवसेना उपविभाग प्रमुख निखील गुरव यांनी नुकताच आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी लेखी राजीनामा शिवसेना जिल्हा अध्यक्ष व युवा जिल्हा अध्यक्ष यांचेकडे सादर केला असून यामुळे खारेपाटण शिवसेना पक्षात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान खारेपाटण मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक एकाच वेळी पक्ष श्रेष्ठीकडे देण्यात आलेल्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून खारेपाटण मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये सद्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर राजीनामे दिलेले शिवसेना पक्षाचे कट्टर कार्यकर्ते तथा पदाधीकारी आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान शिवसेना जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग यांचेकडे देण्यात आलेल्या लेखी राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली असून “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षाचे आम्ही प्रामाणिक काम करत असून पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे सभाळून पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. तर ज्वलंत हिंदुत्व व समाजकारण हाच वारसा आम्हा शिवसैनिकांना बाळासाहेबांकडून मिळालेला आहे.परंतु अलीकडच्या काळात शिवसेना पक्षाची वाटचाल ही हिंदुत्वा पासून दूर होत चाललेली दिसत असून त्यामुळे व्यथित अंतकरणाने आम्ही आमच्या पदाचा व शिवसेना पक्ष सदस्यत्वचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले असून आमचा राजीनामा जिल्हा अध्यक्षांनी मंजूर करावा अशी मागणी खारेपाटण येथील राजीनामा दिलेल्या नाराज शिवसेना पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!