सुनंदा अपराज व दिपाली साटम चिंदर ग्रामपंचायतीच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराच्या मानकरी…..!

आचरा (प्रतिनिधी) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे त्रिशताब्दी वर्ष राज्यात मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. या निमित्ताने चिंदर ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन मंगळवार 3 जून रोजी गौरविण्यात आले. ज्यामध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या सत्कारमूर्ती सौ. सुनंदा शंकर अपराज या अनेक वर्षे आशा सेविका म्हणून कार्यरत असून सामाजिक कार्यात त्याचे योगदान आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्कारमूर्ती दिपाली दिनकर साटम या माजी ग्रामपंचायत सदस्य असून, सामाजिक क्षेत्रात काम करत महिलांसाठी भरीव कामगिरी त्यांनी केली आहे. या दोन्ही सत्कारमूर्तीचा ग्रामपंचायत सरपंच नम्रता महांकाळ, प्रभारी उपसरपंच दिपक सुर्वे ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते गुलाब पुष्प, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, महेंद्र मांजरेकर, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर, धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, संतोष गांवकर, रविंद्र घागरे, सागर अपराज, प्रिया पालकर, सुनिल पवार, डॉ. विवेक घाडगे, मनोज हडकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, सचिन आचरेकर, हर्षद बेनाडे, मंगेश नाटेकर, समृध्दी अपराज, स्वरा चिंदरकर, चिन्मयी पाताडे, प्रतिक्षा पालकर, सोनाली माळगावकर, विनिता मसुरकर, सुगंदा भाटकर, पुरुषोत्तम परब, दिगंबर जाधव, रोशनी फर्नांडिस, सिध्देश नाटेकर, रणजित दत्तदास, रोहित पाटील, पवार, नंदिनी पावसकर, सरिता जंगले, अमृता तोरसोळकर, समिर अपराज, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!