कुडाळ एक्साईज कडून गोवा बनावटीच्या दारुसह ५ लाख ३५ हजार चा मुद्देमाल जप्त

ओराेस (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक यांच्या मार्गदशानाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ व स्टॉफ असे सर्वजण मिळून मिळालेल्या बातमीनुसार खाजगी वाहनाने इन्सुली कुडवटेंब गणपती मंदीर समोर जुना इन्सुली – सावंतवाडी महामार्ग येथे थांबून दारुबंदी कायद्याअंतर्गत वाहनांची तपासणीसाठी होंडा सिटी सिल्वर रंगाची चार चाकी वाहन क्र. (एम. एच. ०२ ए के ७२४७ ) तपासणी करिता थांबवली असता त्यामध्ये गोवा राज्यात विक्री करिता निर्मित केलेला परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री करिता प्रतिबंधितकेलेला गोवा बनावटी म‌द्याचे विविध ब्रँडचे मद्याने भरलेले बॉक्स मिळून आले.सदर मुद्देमालाची
वाहनासहित एकूण मुद्देमाल किंमत रु ५,३५,५२० /- एवढी असून वाहन चालक ब्रेन्डन जॉकी रॉड्रिक्स,(वय वर्ष ३० ) रा. घर नं १४१० इन्सुली कुडवटेंब ता सावंतवाडी जि सिंधुदुर्ग यास वाहनासहित ताब्यातघेण्यात आले.

सदर कारवाई मनोज शेवरे अधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली एम एस गरुड निरीक्षककुडाळ यांच्या समवेत दुय्यम निरीक्षक यु एस थोरात, दुय्यम निरीक्षक ए ए वंजारी, सहायकदुय्यम निरीक्षक एस एस चौधरी, जवान व्ही एम कोळेकर, जवान एन पी राणे, जवान पी ए खटाटे, जवान नि वाहन चालक एस एम कदम जवान, एस आर महेकर यांनी केली.पुढील तपास एम एस गरुड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ करत आहेत.

error: Content is protected !!