ग्राहक पंचायत महाराष्ट्र उत्कृष्ट कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दादा कुडतरकर यांचा वैश्य समाजाच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीने कोकण विभागीय उत्कृष्ट कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार सीताराम उर्फ दादा कुडतरकर याना अलीकडेच प्राप्त झाला. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दादा कुडतरकर यांचा वैश्य समाज कणकवलीच्या वतीने कणकवली येथे सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष महेंद्र मुरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन दादा कुडतरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक राजेश सापळे, पी. जे. कांबळे, लवू पिळणकर, गुरुनाथ पावसकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!