तरंदळे-खोतवाडी येथील सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी प्रदिप सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे-खोतवाडी येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी प्रदिप श्रीधर सावंत (७२) यांचे नुकतेच मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रदिप सावंत यांनी आपल्या सेवाकाळात आरवली, अचिर्णे, वैभववाडी, मसुरे, ओरोस आणि दोडामार्ग अशा विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना नेहमी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे ते शेतकरी वर्गात अत्यंत लोकप्रिय होते. तरंदळे गावाच्या विकासातही त्यांचा मोठा सहभाग होता.

जिल्ह्यात पशुधन वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेऊन, सन २००३ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष गौरव देखील केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंडियन आर्मीमधील मेजर आशिष सावंत यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!