खारेपाटण हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनी प्रमिला भारती यांच्या वतीने प्रशालेला २१००० रुपयाची देणगी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी व मुंबई महानगर पालिका शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका प्रमिला गंभीरराय भारती मुळगाव शेजवली, ता.राजापूर यांनी नुकतीच शाळेला सुमारे २१००० /- रुपये रकमेची देणगी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांचेकडे सुपूर्द केली.

प्रमिला भारती या खारेपाटण हायस्कूल स्थापनेच्या पहिल्या बॅचच्या सन १९५८-५९ सालच्या विद्यार्थीनी असून खारेपाटण हायस्कूल शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य विर शंकरराव पेंढारकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले असून आज गुरवारी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेला भेट देऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी शाळेला भेट दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संस्थेचे संचालक व खारेपाटण सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए. डी. कांबळे, संस्थेचे विश्वस्त विजय देसाई, राजेंद्र वरूणकर, दादा कर्ले, मोहन कावळे, दिगंबर राऊत, काँट्रेक्टर प्रवीण अमृते तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी प्रमिला भारती यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!