केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांच्या हवाई पाहणीनंतर टोलनाके सुरू करण्याला वेग
कणकवली(प्रतिनिधी): हातीवले नंतर आता ओसरगाव टोलनाकाही सुरू होण्याच्या टप्प्यात असून त्याबाबतच्या सूचना हायवे टोलनाका ठेकेदार एजन्सीला देण्यात आल्याचे समजते. अलीकडेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण कामाचा हवाई पाहणी करत आढावा घेतला. त्यानंतर हातीवले ते पत्रादेवी दरम्यान हायवे चौपदरीकरण काम बहुतांशी पूर्ण झाले असून लवकरच टोलनाके सुरू करण्यात येतील असे सूतोवाच केले होते. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी हवाई पाहणी केल्यानंतर आठ दिवसांतच राजापूर तालुक्यातील हातीवले येथील टोलनाका 11 एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आता कणकवली ओसरगाव येथील हायवे टोलनाकाही काही दिवसांत सुरू करण्याच्या सूचना हायवे औथोरिटीकडून संबंधित टोलवसुली ठेकेदाराला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता लवकरच सिंधुदुर्गात ही हायवे टोलवसुलीला सुरुवात होणार असल्याचे समजते.












