सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : येणाऱ्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण येत्या २५ जुलै २०२५ पासून सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होणार आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे आणि अन्य भागांमधून कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. या पार्श्वभूमीवर रेल्वेने वेगवेगळ्या मार्गांवर दैनिक व साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
घोषित विशेष गाड्या खालीलप्रमाणे :
दैनिक विशेष गाड्या:
- गाडी क्रमांक 01152 – सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष
- गाडी क्रमांक 01172 – सावंतवाडी रोड – एलटीटी विशेष
- गाडी क्रमांक 01154 – रत्नागिरी – सीएसएमटी विशेष
- गाडी क्रमांक 01104 – सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष
- गाडी क्रमांक 01168 – सावंतवाडी रोड – एलटीटी विशेष
साप्ताहिक विशेष गाड्या:
- गाडी क्रमांक 01166 – मडगाव जंक्शन – एलटीटी विशेष
- गाडी क्रमांक 01186 – मडगाव जंक्शन – एलटीटी विशेष
- गाडी क्रमांक 01130 – सावंतवाडी रोड – एलटीटी विशेष
- गाडी क्रमांक 01446 – रत्नागिरी – पुणे जंक्शन विशेष
- गाडी क्रमांक 01448 – रत्नागिरी – पुणे जंक्शन विशेष










