कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्यामार्फत हळवल येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्याचा संस्थेचा मानस असून संस्थेने कोरोना कालावधीतही लोकोपयोगी कामे करून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे रेनकोट वाटप संस्थेचे सदस्य सिद्धेश परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, मिथुन लाड, मुख्याध्यापक श्री. सावंत, शिक्षिका संचिता परब, दिव्या परब, रेश्मा चव्हाण, श्रीमती राणे तसेच विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होता.












