तपन मानकामे यांचे दातृत्व
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेमध्ये मुंबई येथून सेवानिवृत्त झालेले कलाशिक्षक अनिल आचरेकर यांनी यावर्षीही शासकीय रेखाकला परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्नेही तपन मानकामे यांच्या सहकार्याने रंग साहित्याचे वितरण केले. गेल्या वर्षापासून आचरेकर वायंगणी हायस्कूल मधील रेखाकला परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहेत. त्यांची चित्रकला या विषयी असलेली तळमळ पाहून प्रशाळेचे मुख्याध्यापक टकले यांनी धन्यवाद व्यक्त केले. यावेळी आचरेकर यांच्या सहचारिणी सौ. आचरेकर याही उपस्थित होत्या. कला शिक्षक श्री. जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.












