खारेपाटण हायस्कूल प्राथमिक विभागाच्या शालेय विद्यार्थ्याना

योगेश गोडवे यांचेकडून स्कूल आय डी व खाऊ वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण शिक्षण संस्थेचे संचालक तसेच रोटरी क्लब खारेपाटण चे सदस्य पत्रकार योगेश गोडवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच शेठ न. म. विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल आय. डी. तथा ओळखपत्रे व गोड खाऊ वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम खारेपाटण हायस्कूल येथे राबविण्यात आला. तर इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्रे वितरीत करण्यात आली.

यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव – महेश कोळसुलकर, उपाध्यक्ष भाऊ राणे, संचालक विजय देसाई, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, सचिव अजय गुरसाळे, ट्रेझरर सारिका महीद्रे, सार्जंट आर्म यशवंत रायबागकर, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, रोट्रियन काझी, श्रीम. अमृते, रोट्रीयन सुबोध देसाई, मंगेश गुरव, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीम. दर्पे, श्रीम. गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. योगेश गोडवे यानी वाढदिसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना स्कूल आय. डी. व खाउ वाटप केल्याबद्दल त्यांचे खारेपाटण हायस्कूल प्राथमिक विभाग यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!