रक्षाबंधन साजरे करत महिलांकडून मोटारसायकलस्वारांना हेल्मेट वाटप

ओरोस (प्रतिनिधी) : स्वामिनी महिला मंडळ आणि निसर्ग फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांमभेकर स्मारक पत्रकार भवन येथे रक्षाबंधनाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी उपस्थित महिला भगिनींनी रक्षाबंधन साजरे करत मोटारसायकल वाहनधारकांना हेल्मेटचे वाटप केले आणि रस्ते सुरक्षा जनजागृतीचा संदेश दिला. या उपक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दीपक नारकर, सुप्रिया वालावलकर, गौरव घाडीगावकर, परशुराम परब यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!