सेवानिवृत्त प्राथ शिक्षकांच्या वतीने नाग्या महादू कातकरी वसतीगृहाला ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शाखा मालवणच्या वतीने जागतिक आदिवासी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांनी पुढाकार घेऊन मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांकडून तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ५५ हजार रुपये निधी गोळा करून सदरची रक्कम नाग्या महादू कातकरी निवासी वसतीगृह वेताळबांबर्डे चे संस्थापक उदय आईर यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी वसतीगृहातील मुलांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुलांना खाऊ, लाडू, केक वाटण्यात आले. यावेळी वसतिगृहातील मुलींनी उपस्थित सर्व मान्यवरांना राख्या बांधल्या. तसेच विजय चौकेकर यांनी आपला वाढदिवसही आपल्या कुटुंबियासमवेत उपस्थित कातकरी मुलांच्या वसतिगृहातील मुलांच्या सहवासात केक कापून साजरा केला. तसेच वाढदिवसानिमित्त विजय चौकेकर यांनी वैयक्तिक पाच हजार रुपयांचा धनादेश उदय आईर यांना दिला.

यापूर्वी या वसतिगृहांत प्रत्यक्ष जाऊन विजय चौकेकर यांनी तेथील परिस्थिती उदय आईर यांच्याकडून जाणून घेतली होती .आणि सदरची परिस्थिती मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या समोर मांडली होती. यावेळी अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रत्येक एक हजार रुपये देणगी गोळा केली होती. पंडित माने, काशिनाथ कलंबिसकर, कोमल कदम, अक्षय कदम यांनीही या साठी मदत केली होती. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गच्या सदस्यांनीही मदत जमा केली. या देणगीची एकत्रित रक्कम रुपये पंचावन्न हजाराचा चेक उदय अहिर यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी संतोष कदम सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक वैभववाडी यांनीही सहकुटुंब उपस्थित राहून मुलांना खाऊ वाटप करून आर्थिक मदत वसतिगृहाला केली. यावेळी विजय चौकेकर यांच्या समवेत सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा पाताडे, रावजी तावडे, संतोष कदम, माध्यमिक शिक्षक पंडित माने सर , पोस्टमास्तर काशिनाथ कलंबिसकर, अखिलभारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हासरचिटणीस अजित कानशिडे सर, जिल्हा युवासंघटक युगांत चव्हाण, दिलीप चव्हाण, अक्षय कदम, सुमन कदम, विशाखा चौकेकर, वैभव चौकेकर आदी उपस्थित होते. उदय आईर यांनी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या उपक्रमाबदल आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!