करुळ घाटपायथा नजीक दरड कोसळली : दीड तास वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. संततधार पडणाऱ्या या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे. करूळ घाट पायथ्या नजीक रस्त्यावर दरड कोसळल्याने दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा फटका एस. टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला.

तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर करूळ चेक नाका ते भट्टीवाडी स्टॉप दरम्यान रस्त्यात मोठा दरडीचा भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे पूर्ण मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे महामार्गाच्या दोन्हीही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार आर. बी. वेल्हाळ कंपनी यांच्याकडून दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.

error: Content is protected !!