पोलीस बतावणी करून वृद्ध इसमांना लुटणाऱ्या टोळीतील आणखी एका इराणी आरोपीतास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्याकडून अटक

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : दिनांक 04.08.2025 रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं 71/2025 भारतीय न्याय संहीता 318 (2), 318 (4), 319 (2), 204, 3 (5) व सावंतवाडी पोलीस स्टेशन गु रजी न. 146/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 204, 319 (2) 3 (5) हे दोन्ही गुन्हे पोलीस असल्याचे बतावणी करून अज्ञात इसम पळून गेल्यामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वीच आरोपीत इसम नामे अबू तालीम मुसा इराणी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाने सांगली येथून अटक केलेली होती.आज दिनांक 17/08/2025 रोजी नमूद गुन्ह्यामध्ये आणखी एक आरोपी इसम नामे उनमत युसुफ इराणी, वय 32 वर्ष, रा-सांगली रेल्वे स्टेशन जवळ,इराणी वस्ती, सांगली यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी सांगली रेल्वेस्टेशन जवळ शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता वेंगुर्ला पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे, यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल- अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस व पोलीस कॉन्स्टेबल- अमर कांडर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!