तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे सुयश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे संपन्न झालेल्या कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केलेआहे. प्रशालेच्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
1)14 वर्ष वयोगट मुले
i) पार्थ सुनिल सांडिम (35 कि. वजनी गट द्वितीय क्रमांक)

2)14 वर्ष वयोगट मुली
i) कृष्णाई नंदकिशोर रावराणे (46 कि.वजनी गट प्रथम क्रमांक )
ii) श्रेया साहिल डोर्ले (36 किलो वजनी गट द्वितीय क्रमांक)

3)17 वर्ष वयोगट मुली
i) ऋतुजा रुपेश चव्हाण (46किलो वजनी गट प्रथम क्रमांक)

4)17 वर्ष वयोगट मुले
i) सिद्धेश सुनिल सांडिम (51किलो वजनी गट प्रथम क्रमांक)
ii) श्रीहरी सिद्धिविनायक गिरीबुवा (60 किलो वजनी गट प्रथम क्रमांक)
iii) आकाश अपन्ना गोंधळी (66 किलो वजनी गट प्रथम क्रमांक)
iv) प्रथमेश अजित चिखले (71 किलो वजनी गट प्रथम क्रमांक)

5)19 वर्ष वयोगट मुले
i) सुरज राजन तिरोडकर (57 किलो वजनी गटप्रथम क्रमांक)
ii) जतीन मधुकर चव्हाण (61 किलो वजनी गट प्रथम क्रमांक)

प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक ए. व्ही. पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार,शाळा समिती चेअरमन, संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक पी. के. पारकर, पर्यवेक्षक व्ही. पी. राठोड, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले असुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!