20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज ना सुट्टी

अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केली सुट्टी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेली धुवांधार बरसात अद्याप सुरूच असून अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सर्व अनुदानित, विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद च्या सर्व शाळा, महाविद्यालये याना 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!