रोटरी व इनरव्हील क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण व पाककला स्पर्धा

नाविन्यपूर्ण पाककलेची आवड असणाऱ्या महिलांना सुवर्णसंधी

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी व इनरव्हील क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मी विष्णू हॉल, कॉलेज रोड कणकवली येथे एक दिवसीय पाककला प्रशिक्षण होणार आहे. तसेच त्यानंतर पाककला स्पर्धा सुद्धा होणार आहेत.

दिवाळी सणाची पूर्वतयारी म्हणून रोटरी व इनरव्हील क्लब कणकवली तर्फे नाविन्यपूर्ण पाककला शिकण्याची सुवर्णसंधी इच्छुक महिलांना मिळणार आहे.मात्र त्यासाठी प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नोंदणी करावी. असे आवाहन रोटरी तर्फे करण्यात आले आहे.

पाककला प्रशिक्षणात गव्हापासून बनवता येणारी बिस्किट,प्रोटिन्स चॉकलेट बार,गुलाब जामुन केक यासारख्या नाविन्यपूर्ण विविध पाककला माहितीसह प्रत्यक्ष करून दाखवल्या जाणार आहेत. पाककला प्रशिक्षण एक नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे.

त्यानंतर पाककला स्पर्धा संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत होणार आहे. पाककला स्पर्धेसाठी विषय- आरोग्यदायक पौष्टिक दिवाळी फराळ-कोणताही एक पदार्थ असा असून सहभागी स्पर्धकांनी आपला पदार्थ घरीच तयार करून सजावटीसह लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये आणायचा आहे. स्पर्धा संपल्यावर लगेच परीक्षण होऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास गॅस शेगडी, द्वितीय क्रमांक-कुकर, तृतीय क्रमांकास इडलीमेकर, उत्तेजनार्थ एक बक्षीस असे बक्षीस स्वरूप असणार आहे. तरी प्रशिक्षण व स्पर्धेसाठी लवकरात लवकर दिशा दीपक अंधारी 9422997667 अथवा राजश्री राजेंद्र रावराणे 9420332571 यांना संपर्क करावा, असे आवाहन रोटरी अध्यक्ष सुप्रिया समीर नलावडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!