रिक्षा – मोटरसायकल च्या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील गरड परिसरात रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावर झाला. अज्ञात रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली आणि पोलिसांना माहिती दिली. अपघातात रिक्षाचेही मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!