विलास नावले यांची भाजपा वैभववाडी सरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी निवड

तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केली नियुक्ती

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं. 2 चे सरपंच विलास नावले यांची वैभववाडी तालुका सरपंच – उपसरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी नावले यांना नियुक्तीपत्र दिले आहे. विलास नावले यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लोरे नं. 2 गावच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. भाजपा पक्ष संघटनात्मक कामातही नावले यांचा अग्रणी सहभाग असतो. नावले यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर वैभववाडी तालुका सरपंच – उपसरपंच संघटना तालुकाध्यक्षपदी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सरपंच विलास नावले यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!