सावंतवाडी शहरातील धोकादायक विजेचे खांब बदलण्याच्या कामास प्रारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील जीर्ण व धोकादायक विज खांब बदलण्याचे काम आज पासून सुरू करण्यात आले. येत्या दिड महिन्याच्या काळात शहरातील सात ते आठ ठिकाणचे पोल बदलण्यात येणार आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी संदिप भरे यांनी दिली. दरम्यान सामाजिक बांधिलकी या संघटनेच्या माध्यमातून याबाबतची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे खांब बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. असा दावा संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केला आहे. तसेच हे काम मार्गी लावून धोकादायक खांब बदण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या श्री भरे त्यांच्या टिमचे त्यांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!