भाजपा पडेल मंडल आयोजित रक्तदान शिबिरात १५६ दात्यांचे रक्तदान

देवगड (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसाचे औचित्य तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त भाजपा पडेल मंडलातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १५६ दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.

भाजपकडून देशभर साजऱ्या होत असलेल्या सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या वेळी मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, रवी पाळेकर, अमोल तेली, रामकृष्ण राणे, संजय बोंबडी, संजना आळवे, अंकुश ठुकरूल, रामकृष्ण जुवाटकर, संजय लाड, भूषण पोकळे, प्रवीण पासठे, विश्वनाथ खानविलकर, संतोष चव्हाण, कृष्णा नर, राजन लाड, राजू जठार, उदय पाटील, महेश पडवाल, कल्पेश नारकर, भाई नारकर, गणेश नारकर, सादिक डोंगरकर, दीपक परब आदी पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पडेल मंडलाने मागील आठवड्यात किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता अभियान राबविले होते. त्याच धर्तीवर आता रक्तदान शिबिर यशस्वी करून १५६ दात्यांनी मोदींच्या कार्याला सलाम केल्याचे मंडल अध्यक्ष बंड्या नारकर यांनी सांगितले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लाईफ टाइम हॉस्पिटल रक्तपेढी, फणसगाव आरोग्य केंद्रातील अधिकारी व तंत्रज्ञ यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्वांचे मनःपूर्वक आभार मंडलाच्यावतीने अध्यक्ष बंड्या नारकर यांनी मानले.

error: Content is protected !!