करूळ घाटात एसटी बस गटारात कलंडली

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटातील अवघड वळणावर टायर पंक्चर झाल्यामुळे अक्कलकोट देवगड  एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.
अक्कलकोटहून देवगडकडे जाणारी एसटी बस करूळ घाट उतरत असताना यु आकाराच्या अवघड वळणा नजीक अचानक एसटी बसचा टायर पंक्चर झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी दरडीकडच्या बाजूला उजव्या साईटला घेतली. त्यामुळे बसच पुढचा टायर गटारात जाऊन बस कलंडली. जर बस दरीकडच्या बाजूला गेली असती तर बस दरीत कोसळून मोठा अपघात घडला असता. सुदैवाने या अपघात कोणीही जखमी झालेले नाही. उशिरापर्यंत अपघाताची  नोंद वैभववाडी पोलीस ठाणेत करण्यात आली नव्हती.

error: Content is protected !!