कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकपदाची जबाबदारी दिपक घोडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिपक घोडे यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेतली.
जनतेला एसटीच्या सक्षम सुविधा पुरवा अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिल्या.
श्री. घोडे यांनी यापूर्वी विविध विभागांत उल्लेखनीय सेवा बजावली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा सिंधुदुर्ग विभागाला होणार आहे.











